मुंबई : बंगळूरच्या अल कायदा इंडियन सबकॉन्टिनेंटची शमा परवीन हिने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारतावर हल्ला करण्यासंदर्भातील एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. भारताकडून मध्यंतरी झालेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिने आपल्या पोस्ट म्हटले होते की, पाकिस्तानने याचा फायदा घेत, भारतावर हल्ला करावा आणि हिंदुत्वाचा नायनाट करावा.
मिळालेल्या वृत्तानुसार, गुजरात एटीएसने म्हटले की, भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर दोन दिवसांनी, शमा परवीनने फेसबुक अकाउंटवर पोस्ट केले, ज्यामध्ये तिने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा फोटो टाकला आणि म्हटले की, "तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे... इस्लामचा प्रचार करण्यासाठी, मुस्लिम भूमी एकत्रित करण्यासाठी आणि हिंदू धर्म आणि यहूदींना नष्ट करण्यासाठी खिलाफत योजनेचा स्वीकार करा."
परवीनच्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ आढळला, ज्यामध्ये एक धर्मगुरू पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल मुस्लिमांवर टीका करत आहे आणि भारतीय सैन्याला दिलेल्या पाठिंब्यालाही विरोध करत आहे. एटीएसने म्हटले की एका व्हिडिओमध्ये अल कायदाचा नेता गजवा-ए-हिंदबद्दल बोलताना आणि भारताविरुद्ध हिंसाचार भडकवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हिंदू धर्म आणि भारतातील लोकशाही शासनाच्या संस्थांना लक्ष्य करून आक्षेपार्ह भाष्ये देखील करण्यात आली आहेत.
अशी माहिती आहे की, शमा परवीन दोन फेसबुक पेज आणि एका इंस्टाग्राम अकाउंटद्वारे भारताविरुद्ध विष पसरवत असे. या सोशल मीडिया हँडलवर तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. ती सोशल मीडियावर अल कायदाच्या ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूलला पुढे नेण्याचे काम करत होती.
शमा परवीनला बेंगळुरू येथून अटक
गुजरात एटीएसने दि. २९ जुलै २०२५ रोजी अल कायदाच्या ऑनलाइन दहशतवादी मॉड्यूलला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली शमा परवीनला अटक केली. ती भारतातील अल कायदा मॉड्यूलची प्रमुख होती. २३ जुलै २०२५ रोजी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधून अटक केलेल्या ४ इस्लामिक दहशतवाद्यांच्या चौकशीदरम्यान शमा परवीनचे नाव समोर आले. त्यानंतर शमा परवीनला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली. सध्या ती एटीएसच्या रिमांडवर आहे.