मुंबई : ज्येष्ठ अभिनेते व राज्यसभा खासदार कमल हसन यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन तामिळनाडू भाजपद्वारा करण्यात आले आहे. सनातन धर्मावर त्यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांच्या भावना दुखावल्या असून, कमल हसन तीव्र संताप याठिकाणी व्यक्त होताना दिसतोय. कमल हसन यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सनातन धर्माविरोधात भाष्य केले होते.
भाजपचे तामिळनाडू राज्य सचिव अमर प्रसाद रेड्डी यांनी म्हटलेय की, उदयनिधी स्टॅलिन नंतर आता कमल हासन सनातन धर्माचा नाश करू पाहतायत. रेड्डी यांनी लोकांना आवाहनही केले की, त्यांनी कमल हसन यांचे चित्रपट पाहू नयेत; जेणेकरून ते भविष्यात सार्वजनिक व्यासपीठावरून हिंदूंना दुखावणारी अशी बेजबाबदार विधाने करणार नाहीत.
आगराम फाउंडेशनने आयोजित एका कार्यक्रमात कमल हसन म्हणाले होते की, देश बदलण्याची शक्ती फक्त शिक्षणात आहे. हुकूमशाही आणि सनातनच्या बेड्या तोडू शकणारे हे एकमेव शस्त्र आहे.'