"कदाचित राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

07 Aug 2025 18:01:49

नवी दिल्ली : (CM Devendra Fadnavis on Rahul Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी ७ ऑगस्टला पत्रकार परिषद घेत व्होट चोरीचा आरोप केला आहे. याबाबत विचारता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ते यावेळी म्हणाले की मला याबाबत वाटते वाटते. त्यांनी एकदा त्यांनी चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदूमधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असे बोलत असतील, असा टोला लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीसांचे राहुल गांधींना उत्तर

"मला वाटतं मतांची चोरी महाराष्ट्रातही झाली नाही आणि भारतातही झालेली नाही. काही चोरीला गेलेच असेल तर राहुल गांधींच्या मेंदूमधून चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्ड डिस्क करप्ट झाली आहे. त्यामुळे ते त्याच त्याच गोष्टी रोज बोलतात. राहुल गांधी खोटं बोलतात आणि पळून जातात, वेगळी आकडेवारी देतात. गेल्या वेळी सांगितलं महाराष्ट्रात ७५ लाख मतदार वाढले. आता सांगितलं की एक कोटी मतदार वाढले. दरवेळी काहीतरी नवं सांगून गंभीर आरोप करण्याचा प्रयत्न करतात. राहुल गांधींना कळलं आहे की बिहारमध्येही त्यांना निवडून येता येणार नाही. त्यामुळे राहुल गांधी कव्हर फायरिंग करत आहेत. अशा प्रकारचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे."


"माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की..."

माझा राहुल गांधींना प्रश्न आहे की तुम्हाला जर मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतो ना? निवडणूक आयोगाने बिहारमधल्या मतदारांचं कॉप्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरु केले आहे तर त्याला तुम्ही विरोध का करता? मी तर २०१२ मध्ये मागणी केली होती. एकीकडे असा विरोध करायचा आणि दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत असे म्हणायचे. एक प्रकारे भारताच्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्थांवरचा लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, भारतात अराजक तयार झालं पाहिजे अशी मानसिकता राहुल गांधी यांची दिसते आहे. कारण त्यांना त्यांच्या पक्षाचे भविष्य दिसत नाहीये." असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे.







Powered By Sangraha 9.0