श्रीनगर : (No ceasefire violation along LoC in J&K, says Indian Army) नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते. तथापि, आता हे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले असून, नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्ट केले आहे.
आहे.
भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, "पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत काही माध्यमे आणि सोशल मीडियावर वृत्त आले आहे. पूंछमधील नियंत्रण रेषेवर कोणतेही शस्त्रसंधी उल्लंघन झालेले नाही", असे माध्यमे आणि सोशल मीडियावरील वृत्तांना उत्तर देताना स्पष्ट केले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने वृत्तानुसार, "पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर येथील नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. पूंछ येथील कृष्णा घाटी खोऱ्यात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानेही शस्त्रसंधी उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी दोन्ही बाजूने १५ मिनिटं गोळीबार सुरु होता. दरम्यान आता गोळीबार थांबला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे."