मुंबई: भारताच्या सांस्कृतिक वैभावाचे साक्षीदार म्हणजे इथली मंदिरं, या मंदिरांची निर्मीती कशी झाली, त्या मंदिरांची शैली कशी ओळखावी? महाराष्ट्रातील तसेच भारतातील वैशिष्ठ्यपूर्ण मंदिरांचा इतिहास काय या विषयावर भटकंती कट्टाच्या माध्यमातून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र आणि मूर्तीशास्त्रचे अभ्यासक केतन कैलास पुरी यावेळी श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गुरुवार दि. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६:३० वाजता, दादर येथील मामा काणे हॉटेल हॉल येथे सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम निशुल्क असून, मोठ्या संख्येने इतिहासप्रेमींनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.