
मुंबई : श्रीकोपीनेश्वर सांस्कृतिक न्यास, ठाणे यांच्या माध्यमातून लेखक अभिजित जोग यांच्या ‘ भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ६ वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमात माजी सनदी अधिकारी, शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी श्रोत्यांना मार्गदर्शन करणार असून, लेखक, अभिनेते दीपक करंजीकर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद भागवत करणार असून, या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकोपीनेश्वर सांस्कृतिक न्यासचे सचिव डॉ. अश्विन बापट, कार्याध्यक्ष संजीव ब्रम्हे, अध्यक्ष उत्तम जोशी यांनी केले आहे.