
खानिवडे : वसईच्या उद्धव ठाकरे गटातील शिवसेच्या व बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक व वसईच्या आमदार स्नेहा दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करून हाती कमळ घेतले.
आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः " या राष्ट्रहितप्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत व पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र दादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर श्रद्धा ठेवून वसई विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात ०५ ऑगस्ट रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांकडून कार्यकर्त्यांचे भाजपा परिवारात स्वागत करण्यात आले.
निलेश भानुसे – वसई शहर समन्वयक, सुनील मिश्रा – तालुका पदाधिकारी युवासेना,प्रकाश देवळेकर – उपतालुका प्रमुख, वैभव म्हात्रे – उपजिल्हा प्रमुख, युवासेना, योगेश भानुसे – उपशहर प्रमुख,संतोष घाग यांनी तसेच बहुजन विकास आघाडीतील नितीन ठाकूर, संतोष कनोजिया, दिनेश भानुशाली व सामाजिक कार्यकर्ते आनंद पाटील
यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.
या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील, माधवीताई नाईक, आमदार राजन नाईक, नवनाथ बन, वसई-विरार शहर भाजपा जिल्हा अध्यक्षा प्रज्ञा पाटील, महेंद्र पाटील, व सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये भाजपाचा विजय अधिक निश्चित झाला आहे.असे यावेळी सांगितले जात होते.