'CMFRI'मध्ये नोकरीची संधी - महाराष्ट्रातील 'या' पदांसाठी मागवले अर्ज

    05-Aug-2025
Total Views |
vacancy in cmfri



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थेने (सीएमएफआरआय) यंग प्रोफेशनल आणि फिल्ड अस्टिस्टंट या पदांसाठी अर्ज मागवले आहेत (vacancy in cmfri). हे अर्ज www.cmfri.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छूकांनी सोमवार दि. १८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता 'वॉक-इन' मुलाखतीकरिता सीएमएफआरआयच्या मुंबईतील वर्सोव्याच्या केंद्रात उपस्थित राहायचे आहे. (vacancy in cmfri)
 
 
 
सीएमएफआरआयकडून रेवस-रेड्डी या प्रस्तावित महामार्गाचा किनारी उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. यासाठी विशेष प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली असून या प्रकल्पामध्ये तीन पदे भरण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. यंग प्रोफेशनल या पदासाठी दोन जागा भरण्यात येणार आहेत. बीएससी आणि मत्स्यविज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेल्या उमदेवारास याकरिता प्राध्यान देण्यात येईल. या पदासाठी वयाची अट ही २१ ते ४५ वर्षे असून ३० हजार रुपये पगार दिला जाईल. या दोन जागांवर निवडण्यात येणाऱ्या व्यक्तीला धरमतर ते रेवदंडा खाडी आणि केळशी ते जयगड खाडी या भागातील परिणामांचा अभ्यास करावा लागेल. फिल्ड अस्टिटंट पदासाठी एक जागा भरण्यात येणार असून त्यासाठी मत्स्यविज्ञान विषयात पदवीचे शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिले जाईल.
 
 
या पदासाठीचे अर्ज www.cmfri.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक १८.०८.२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून दुसरा मजला, CIFE जुने कॅम्पस, सात बंगला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई 'वॉक-इन' मुलाखतीस उपस्थित राहावे.