जम्मू-काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

05 Aug 2025 14:09:55

नवी दिल्ली : (Satyapal Malik former J&K governor passes away at 79) जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले, यासंदर्भात त्यांचे वैयक्तिक सचिव केएस राणा यांनी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी माहिती दिली. मलिक गेल्या काही आठवड्यांपासून मूत्रपिंडाशी संबंधित आजारावर उपचार घेत होते.

मलिक यांनी ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. त्यांच्याच कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले आणि राज्याचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला. आज या निर्णयाला सहा वर्ष झाली आहेत. नंतर त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ पर्यंत मेघालयाचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले.



Powered By Sangraha 9.0