माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या निधनाचे वृत्त दुःखद : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

05 Aug 2025 12:42:36

मुंबई : झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात जवळपास पाच दशके समर्पित भावनेने कार्य केले, अशा शब्दात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त केला.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, "माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी संसद सदस्य म्हणून झारखंडमधील सामान्य जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या. मुख्यमंत्री असताना त्यांनी सामान्य नागरिकांचे विशेषतः आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्यांच्या निधनाने झारखंडने एक पितृतुल्य व्यक्तिमत्व आणि कुशल संसदपटू गमावला आहे. दिवंगत शिबू सोरेन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांचे चिरंजीव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत," असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Powered By Sangraha 9.0