रालोआ संसदीय पक्षाची आज बैठक

05 Aug 2025 13:36:18

नवी दिल्ली :  भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) संसदीय पक्षाची बैठक आज, मंगळवारी संसदेच्या ग्रंथालयात होणार आहे.

रालोआ संसदीय पक्षाच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार असून यावेळी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार उपस्थित राहतील. बिहारमध्ये बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणा (एसआयआर) वर चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून संसदेत गोंधळ सुरू असताना ही बैठक होत आहे. विरोधी पक्ष एसआयआर मागे घेण्याची मागणी करत आहेत. विरोधकांच्या गदारोळामुळे केंद्र सरकारला लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक, २०२५ आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी (सुधारणा) विधेयक, २०२५ चर्चेसाठी मांडता आलेले नाही.

रालोआच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीविषयीदेखील चर्चा होऊ शकते.
Powered By Sangraha 9.0