
क्षुतपिपासामलां ज्येष्ठां अलक्ष्मीं नाशयाम्यहम् ।
अभूतिम् असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् ॥८
या लेखाची सुरुवात एका वैदिक मंत्राने का केली असावी? असा प्रश्न वाचकांना पडेल... त्याचे कारण असे की, घुबड आणि लक्ष्मीदेवी यांचा सहसंबंध समजून घेताना ऋग्वेदाच्या खिलसूक्तामधे आलेल्या श्रीसूक्ताचा विचार आपल्याला करावा लागेल. याचे कारण ऋग्वेद हा भारतीय संस्कृतीचा मूळ आधार मानला जातो (international owl awareness day). श्री म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा सहवास म्हणजे समृद्धी,संपन्नता! ज्याच्याकडे समृद्धी आहे तो श्रीमंत! पण ही श्रीमंती फक्त पैशाची नसून ती ज्ञानाचीही आहे! अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहिण आहे, अशी धारणा प्रचलित आहे. या अलक्ष्मीचे वाहन म्हणजे घुबड असे मानले जाते (international owl awareness day). मग लक्ष्मीचे वाहन घुबड कसे? याबाबत विविध आख्यायिका प्रचलित असलेल्या दिसतात तसेच स्थानिक लोककथाही रंजक आहेत. (international owl awareness day)
विशेषतः पश्चिम बंगाल,आसाम काही प्रमाणात ओरिसामधे घुबड हे वाहन असलेले लक्ष्मीचे रूप पूजनीय आहे. तिला उलूकवाहिनी लक्ष्मी असे म्हटले जाते. कार्तिक महिन्यातील अमावास्येला बंगालमधे कालीपूजा केली जाते. हिला श्यामा पूजा असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात ही आश्विन अमावास्या असते. ज्या रात्री आपण दिवाळीमधील लक्ष्मीपूजन करतो.
प्राण्यांची निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक देवतेने त्यांच्या कार्याच्या आवश्यकतेनुसार एकेका प्राण्याला,पक्ष्याला आपले वाहन म्हणून निवडले. लक्ष्मीने आपल्याला वाहन म्हणून निवडावे यात सर्वांची चुरस लागली. या वादावर तोड म्हणून लक्ष्मीने सांगितले की, कार्तिक अमावास्येला मी पृथ्वीवर येईन आणि त्यावेळी सर्वप्रथम जो प्राणी/पक्षी मला सामोरा येईल त्याची निवड मी माझे वाहन म्हणून करेन. रात्रीच्या अंधारात लक्ष्मीदेवींचे अवतरण पृथ्वीवर झाल्यावर हे सर्वप्रथम घुबडाच्या लक्षात आले आणि ते देवीच्या जवळ जाऊन पोहोचले. लक्ष्मीला घुबडाचे जाणवलेले हे वैशिष्ट्य म्हणजे गुडूप अंधारातही आपल्याला नेमकी दिशा सापडणे,अंधारावर मात करता येणे. घुबड हे दिवसा झोपते व रात्री ते जागे असते हे आपल्याला सामान्यतः माहिती असतेच. ते गर्दीत राहण्यापेक्षा एकांतात राहणे पसंत करते, ही त्याची पक्षी म्हणून वैशिष्ट्ये आहेत जी त्याला इतर पक्ष्यांपासून वेगळे ठरवतात. परंतु लक्ष्मी ही ज्ञानाचे प्रतीक आहे. कोजागरीच्या रात्री म्हणजे आश्विन पौर्णिमेला ही लक्ष्मी "कोण जागं आहे?" असे विचारत येते. म्हणजेच ज्ञानचक्षु,प्रज्ञाचक्षु उघडे आहेत? असे जणू ती विचारते. हे रूपक कार्तिक अमावास्येच्या अंधार्या रात्रीशी जोडले तर लक्षात येईल की मिट्ट काळोखातही आपली नेमकी दिशा ज्याला सापडेल तो खरा! समजून घेतले की लक्ष्मीचे वाहन घुबड का? याचे उत्तर आपोआप मिळेलच. घुबडाचे प्रथमदर्शन सहसा आकर्षक नसते म्हणून त्याला अशुभ मानले जाते. पण लक्ष्मीपूजनाच्या रात्री त्याचे दर्शन शुभ मानतात कारण घुबड आले म्हणजे त्यावर आरूढ होऊन पाठोपाठ लक्ष्मीदेवीही आलीच! घुबडासंबंधी दोन प्रकारच्या धारणा समाजमनात दिसतात. एकीकडे ते मृत्युची चाहूल देणारे म्हणून काहीसे भीतीदायक आहे, तर दुसर्या बाजेला ज्ञान, स्वातंत्र्य, समृद्धी याचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे. लोकमानसात प्रचलित कथा रूपकात्मक असतात आणि त्यातून बोध आपोआपच मिळतो. अंधार हा अज्ञानाचे,निराशेचे,दुःखाचे प्रतीक आहे. पण त्या अंधारातही जगाच्या कोलाहलापासून लांब राहून आपल्या आयुष्याची ज्ञानाची,प्रगतीची नेमकी दिशा शोधत पुढे जात राहणे असे घुबड सांगत असावे का?
९४२२०५९७९५