कल्याण पश्चिम शहाड येथील ५० फुटी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे भूमिपूजन

03 Aug 2025 18:40:53

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शहाड येथे सिमेंट रस्त्याच्या काँक्रीटच्या कामाचे भूमिपूजन रविवारी जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आणि कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पार पडले.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विकासाची गंगा अवतरली आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा विडा आमदार भोईर यांनी उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहाड स्टेशन रोड येथील अंबर हॉटेल ते गणेश कोट ऑफिसपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. येथील माजी नगरसेवक गणेश कोट यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. ज्याला आमदार भोईर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल स्थानिक नागरिकांनी आमदार भोईर यांचे मनापासून आभार मानले आहेत..

याप्रसंगी शाखाप्रमुख कैलास ढोणे, सुनील भोईर, गावप्रमुख राजेश भंडारी, नितीन कोट, संतोष कशेळकर, युनूस शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0