वडोदरा येथे धर्मांधांकडून गणेशोत्सवाला गालबोट एका अल्पवयीनासह दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

29 Aug 2025 17:11:33

मुंबई: देशभरात गणेशोत्सव साजरा होत असून सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना या उत्सवास गालबोट लावण्याचा प्रकार गुजरातच्या वडोदरा येथे घडल्याचे निदर्शनास आले आहे. वडोदरातील पाणी गेट परिसरात गणेश मूर्तीच्या मिरवणुकीवर अंडी फेकण्यात आल्याचा संतापजनक प्रकार काही धर्मांधांनी केला. मांजलपुर गणेश मंडळाच्या श्रीजींच्या प्रतिमेच्या स्थापनावेळी उशिरा रात्री साधारण दीड-दोन वाजता मदार मार्केट जवळ काही धर्मांधांनी अंडी फेकली. या घटनेमुळे गणेश मंडळांत तीव्र रोष निर्माण झाला. सध्या वडोदरा शहर पोलिसांनी अंडी फेकणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी सार्वजनिक माफीही मागितल्याचे लक्षात येते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई केली. काही तासांतच पोलिसांनी एका अल्पवयीनासह दोन आरोपींना पकडले आणि नवीन प्रतिमेचीही व्यवस्था केली. आरोपींची ओळख सूफियान मंसुरी आणि शाह नवाज उर्फ बदबाद कुरेशी अशी झाली आहे. पोलिसांनी या आरोपींना त्यांच्या खानगाह मोहल्ल्यात सार्वजनिकरीत्या परेड करून माफी मागायला लावली.

या घटनेनंतर गणेश मंडळांमध्ये आणि स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष उसळला होता. परंतु पोलिसांनी तातडीने आरोपी शोधून काढत कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यामुळे वातावरण शांत झाले आणि कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडला नाही.

Powered By Sangraha 9.0