पंतप्रधान मोदींना शिवीगाळ, पाटण्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

29 Aug 2025 14:05:50

पाटणा : (Bihar) बिहारच्या दरभंगा येथील राजद आणि काँग्रेसच्या एका संयुक्त सभेत व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली गेली. त्यानंतर बिहारच्या पाटणा येथील काँग्रेस मुख्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.

पंतप्रधान मोदींबद्दल अपशब्द वापरल्यामुळे हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाल्याचे बोलले जात आहे. एकमेकांवर दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहे. पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे बिहार निवडणुकीपूर्वी राज्यातले वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, बिहारमधील मतदारयाद्यांतील नावे वगळण्यावरुनही आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

दरम्यान, बिहारमध्ये राजकीय सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आई यांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे दरभंगा येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी माध्यमांना सांगितले. इंटरनेटवर एका कथित व्हिडिओमध्ये आरोपी इंडी आघाडीच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींविरुद्ध आणि त्यांच्या दिवंगत आई यांना शिवीगाळ करताना दिसत आहे. यामुळे बिहारमध्ये राजकीय वाद निर्माण झाला आहे.




Powered By Sangraha 9.0