बेडेकर सदनात रंगणार भक्तीरसाचा अनुपम्य सोहळा !

29 Aug 2025 17:53:05

मुंबई, लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बेडेकर सदन चाळीमध्ये, यंदाच्या वर्षी भाविकांना गणेशोत्सवानिमित्त भक्तिरसाचा अनुपम्य सोहळा अनुभवायाला मिळणार आहे. दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता अभंग Repost या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेडेकर सदन, मुघबट, गिरगाव येथील अंगणात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

लोकमान्य गणेश सार्वजनिक मंडळाच्या माध्यामतून मागची १२५ वर्ष सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोधन तथा सांस्कृतिक एकता निर्माण करणे हा उद्देश आहे. अभंग रिपोस्ट या संगीत मंडळींच्या माध्यमातून पारंपरिक अभंगांना आधुनिक संगीताची जोड दिली जाते. भक्तीरसात न्हालेल्या त्यांच्या सादरीकरणात संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांचे अभंग आधुनिक वाद्यांच्या साथीने सादर केले जातात.

Powered By Sangraha 9.0