सुदामेचा व्हिडीओ डिलीट होताच डॅनी पंडीतचं नवं रील, पुन्हा दाखवलं हिंदू-मुस्लीम ऐक्य

28 Aug 2025 17:27:26


मुंबई : मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त व्हिडीओ पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि रीलस्टार म्हणून ओळख असणारा अथर्व सुदामे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. पण त्यानंतर त्याच्यावर सर्वच स्थरातून टिका होऊ लागली. मग काही वेळातच त्याने तो व्हिडीओ डिलीट केला. हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश देणारा व्हिडीओ त्याने शेअर केला होता. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मोठा वाद निर्माण झाला. अनेक संघटनांनी त्याच्यावर आक्षेप घेतला होता. पण आता अथर्व नंतर त्याचाच मित्र व प्रसिद्ध रीलस्टार डॅनी पंडीतने नुकताच नवा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे आता अथर्व सुदामेला पाठिंबा देण्यासाठी त्याचा मित्र धावून आला आहे असं म्हटलं जात आहे.

डॅनीने पोस्ट केलेला व्हिडीओ,







View this post on Instagram
















A post shared by Danny pandit (@dannyypandit)



दरम्यान या व्हिडीओमध्ये, एका कुटुंबात बाप्पाची आरती सुरु आहे. इतक्यात, एका लहान मुलीला तिची आई दरवाजातून आवाज देते ‘झोया’;  यानंतर सगळेच शांत होतात. आणि आरती सोडून ही चिमुकली मध्येच निघून गेली याचं सगळ्यांना काहीसं वाईट वाटतं. पण, काहीच क्षणात ही चिमुकली परत येते. तेव्हा तिच्या हातात एक ताट असतं. आणि या ताटात बाप्पाचे आवडते मोदक असतात. डॅनी झोयाला विचारतो हे मोदक कोणी दिले? तेव्हा ती म्हणते अम्मीने… आणि झोयाच्या मागोमाग तिची आई सुद्धा डॅनीच्या घरी येऊन सर्वांना प्रसाद देते, असं या व्हिडीओच्या शेवटी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमधून डॅनीने पुन्हा एकदा गणेशोत्सवात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला आहे. अथर्व सुदामेचा व्हिडीओ डिलीट झाल्यावर आता डॅनीने शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तर या व्हिडीओला कॅप्शन देत डॅनीने ‘सत्य घटनेवर आधारीत’ असंही लिहिलं आहे.

काय होता अथर्वने शेअर केलेला व्हिडीओ...
पाहा...




प्रंचड विरोध झाल्यानंतर अथर्वने हा व्हिडीओ डिलीट केला होता. मात्र त्यापूर्वीच हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.


Powered By Sangraha 9.0