भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची नियूक्ती

26 Aug 2025 19:07:23

मुंबई : गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियूक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सोमवार, २५ ऑगस्ट रोजी रात्री याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे भंडाऱ्याचे विद्यमान पालकमंत्री म्हणून काम पाहत होते. मात्र, आता ही जबाबदारी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर, मंत्री संजय सावकारे यांना बुलढाणा जिल्ह्याच्या सहपालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांनी याबाबतचा आदेश काढला. दरम्यान, आता पंकज भोयर हे भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळतील.

Powered By Sangraha 9.0