लाडक्या बाप्पाची पर्यावरणपूरक आरास करा आणि जिंका लाखोंची बक्षीसे!

26 Aug 2025 19:00:10

मुंबई, 'दै. मुंबई तरुण भारत' व 'महाएमटीबी' आयोजित आणि 'महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ' प्रस्तुत 'पर्यावरणरपूरक घरगुती गणेशमूर्ती आणि मखर सजावट स्पर्धा २०२५'ची घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपल्या बाप्पाची पर्यावरणपूरक आरास करुन लाखोंची बक्षीसे जिंकण्याची संधी यंदाही राज्यभरातील तमाम गणेशभक्तांना मिळणार आहे. 'दै. मुंबई तरुण भारत' व 'महाएमटीबी' आयोजित आणि 'महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ' प्रस्तुत 'पर्यावरणरपूरक घरगुती गणेशमूर्ती आणि मखर सजावट स्पर्धा २०२५' या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ही संधी प्राप्त होणार आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रमुख सहयोगी संस्था म्हणून ‘श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास, प्रभादेवी’चे सहयोग लाभले आहे. या उपक्रमास विविध क्षेत्रातील एकूण २० संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठींबा दर्शविला आहे. टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी २४ तास’ या उपक्रमात सहभागी आहेत. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ‘मुंबई तरुण भारत’तर्फे गणेशभक्तांना करण्यात आले आहे. एकूण लाखोंची बक्षीसे असलेल्या या स्पर्धेत अंतिम सोहळ्यात पारितोषिक प्रदान करत सन्मानचिन्हासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९५९४९६९६४५ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क साधा किंवा दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून आपले नावाची स्पर्धेसाठी नोंदणी करा. 

सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा! 


प्रथम पारितोषिक – ₹७५,००१

द्वीतीय पारितोषिक – ₹५०,००१

तृतीय पारितोषिक – ₹२५,००१

चतुर्थ पारितोषिक – ₹१०,००१

पाचवे पारितोषिक – ₹५,००१

उत्तेजनार्थ पारितोषिक – ₹ २००१

स्पर्धेचे नियम व अटी

आपल्या लाडक्या बाप्पाचे व पर्यावरणपूरक मखरसजावटीचे तीन फोटो आणि त्यासह सजावटीची १०० शब्दांत माहिती देणे आवश्यक आहे.

१) मखर, आरास आणि सजावटीसह गणपती बाप्पाची पुजेच्या मूर्तीचा फोटो

२) थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळावा

३) नैसर्गिक फुलांचा वापर करून केलेली आरास

४) वापरात नसलेल्या कागदाचा लगदा वापरून केलेली आरास

५) अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल अशी आरास

६) देशभक्ती, सामाजिक, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक आदी देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य

७) श्रींच्या मूर्तीचा सुस्पष्ट असा एक, सजावटीचा एक आणि बाप्पासह सहकुटूंब एक, असे तीन फोटो पाठवावेत.

८) स्पर्धेसाठी तीन रंगीत छायाचित्रे दि. २७ ऑगस्ट २०२५ ते दि. ७ सप्टेंबर २०२५ रात्री १२.०० वाजेपर्यंत पाठवावेत.

९) उशीरा मिळालेल्या छायाचित्राचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

१०) स्पर्धेसाठी पाठविलेल्या छायाचित्रांमध्ये गणेशमूर्ती, मखर इत्यादींची सजावट परीक्षकांना स्पष्ट दिसली पाहिजे.

११) परीक्षकांचा आणि आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.



Powered By Sangraha 9.0