पुण्यात विविध ठिकाणी साजरी होणार वराह जयंती

25 Aug 2025 11:55:19

मुंबई
: वराह जयंतीच्या निमित्ताने पुणे शहरात विविध शाळांमध्ये, सार्वजनिक मंडळांकडून तसेच व्यापारी मंडळांकडून भव्य मिरवणूक आणि महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

मिरवणुक, आरती आणि किर्तनाचे प्रमुख उद्दिष्ट पर्यावरण रक्षण, सांस्कृतिक जागृती आणि वराह देवतेचा संदेश समाजात पोहोचवणे, असे असणार आहे. या मिरवणूकांमध्ये समाजातील सर्व संघटना आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खराडी- चंदननगर येथील अखिल विडीकामगार मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरज गंजी यांनी केले.

खराडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, ऑक्सिजन पार्क, बालाजी पार्क, जगद्गुरू इंटरनॅशनल स्कूल, लोहगाव या ठिकाणी सायं. ६:०० वाजता कार्यक्रम असणार आहेत. तर शहरात गंज पेठ व आंबेडकर वसाहत, मार्केटयार्ड येथे सायं. ७:०० वाजता कार्यक्रम आहेत. श्रीराम मंदिर, वाघोली व श्री गुरूनानक नगर, काशेवाडी येथे सायं. ६:०० वाजता महाआरती होणार आहे.




Powered By Sangraha 9.0