मुंबई जगलेला माणूस आणि सच्चा मुंबईकर आमदार अमीत साटम

25 Aug 2025 11:53:48
 
२५ हून अधिक सार्वजनिक मैदाने विकसित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. तसेच मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांचे विकासकामही त्यांनी आपल्या कारकिर्दीत पूर्ण केले आहे. ६५ दशलक्ष वर्षे जुना गिल्बर्ट टेकडी (जगातील दुर्मिळ खडक रचना) संवर्धन करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. आपल्या विभागातील बेकायदेशीर अतिक्रमण आणि बांधकामांविरोधात उभे राहून पाडकाम धडक कारवाईही त्यांनी केली.या शिवाय पायाभूत सुविधा विकास, शहरी नियोजन व धोरण आखणी, कायदा व सुव्यवस्था पाहणे, लोकमत घडवणे व विवाद निवारण, संस्थात्मक व्यवस्थापन व नेतृत्व, कायदे निर्मिती व सार्वजनिक धोरण आखणी, विविध संस्कृती, धर्म व भाषा असलेल्या समाजासोबत काम करणे, आरोग्य, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापनावर देखरेख या विषयांवरही त्यांनी काम केले आहे.राजकारणात येण्यापूर्वीही त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली चमक दाखवली होती. टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेड येथे ४ वर्षे मानव संसाधन अधिकारी म्हणून कार्य. जबाबदाऱ्या : भरती, कार्यक्षमता व्यवस्थापन, कौशल्य नकाशीकरण, प्रशिक्षण व विकास, संघटनात्मक विकास, कर्मचारी व्यवहार आदी जबाबदारी त्यांच्यावर होती.
  
केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या महत्वाच्या समस्या हाताळण्यासाठी आणि परदेशातील नवे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी त्यांनी विविध देशांचे दौरेही केले आहेत. एप्रिल २०११मध्ये त्यांनी हवामान बदल व स्वच्छ ऊर्जा या विषयावर यू.एस. स्टेट डिपार्टमेंट आयोजित इंटरनॅशनल व्हिजिटर्स लीडरशिप प्रोग्राम (IVLP) पूर्ण केला. सप्टेंबर २०१६मध्ये त्यांनी ईस्ट-वेस्ट सेंटर, होनोलुलु (यू.एस. काँग्रेस स्थापन) आयोजित न्यू जनरेशन सेमिनार सांस्कृतिक वारसा या विषयावरील सत्रात सहभाग घेतला.‘वसुंधरा’ या जागतिक तापमानवाढीवरील माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन सोबत त्यांचा २० वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. त्यांनी आत्तापर्यंत अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया, यू.ए.ई., थायलंड, स्वित्झर्लंड, इटली, ब्रिटन, फ्रान्स, चीन, झेक प्रजासत्ताक, हंगेरी, जर्मनी, कंबोडिया, म्यानमार या देशांचा दौरा केला.


 
Powered By Sangraha 9.0