मुंबई : ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघा’च्या इतिहास आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संपर्क प्रमुखपदी पावनखिंडवीर रायाजी बांदल यांचे वंशज ‘गडसंवर्धन महाराष्ट्र शासन’च्या गडसंवर्धन समितीचे सदस्य अनिकेतराजे बांदल यांची निवड करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांच्या गडसंवर्धन आणि इतिहास संशोधनामध्ये अनिकेतराजे बांदल हे मोलाची भूमिका बजावत आहेत. रायाजी बांदल आणि बाजी बांदल यांचा वारसा चालवत अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. त्यामुळे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याची निवड राज्यशासनाच्या गडसंवर्धन समितीवर केली. त्यासोबतच ‘सुभेदार’, ‘शेर शिवराज’, ‘पावनखिंड’ या चित्रपटांमध्ये त्यांनी व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. अनेक गडांवर जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार अनिकेतराजे बांदल यांनी केला. ‘आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघा’च्या इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय संपर्क प्रमुखपदी निवड झाल्यामुळे महाराष्ट्रातील गड-किल्ले आणि मराठा इतिहास जगपातळीवर नेण्यास मदत होणार आहे.