मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. आणि ते म्हणजे लग्नाच्या तब्बल ३८ वर्षांनंतर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा हे चर्चेत आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये ते दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तर मागच्या काही महिन्यांत गोविंदाची पत्नी सुनीता अहुजाने अनेक मुलाखती दिल्या आहे. या मुलाखंतीमध्ये दोघांतील दुरावा समोर आला होता.
पण आता पुन्हा एकदा सुनीता आहुजा यांनी गोविंदाबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. काही मिळालेल्या माहितीनुसार सुनीता आहुजा यांनी वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. तसेच, अभिनेत्यावर काही गंभीर आरोपदेखील केले आहेत.
हॉटरफ्लायने दिलेल्या वृत्तानुसार हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia) आणि (ib) अंतर्गत सुनीता आहुजा यांनी याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये सुनीता आहुजा यांनी ३८ वर्षांनंतर त्यांना का घटस्फोट घ्यायचा आहे, याचे कारण सांगितले आहे. त्यात अफेअर, अत्याचार तसेच एकटे सोडल्याचे आरोप त्यांनी गोविंदावर केले आले आहेत.
त्यामुळे सध्या दोघांच्या नात्याची बरीच चर्चा होत आहे. सुनीता यांनी जरी अनेक मुलाखती दिल्या असल्या तरी गोविंदाने मात्र यावर कोणतही भाष्य करणं टाळलं आहे. तसेच अनेक दिवसांपासून पत्नी सुनीता गोविंदापासून वेगळंच राहत असल्याचेही स्वतः सुनीता यांनीच सांगितले होते.
मात्र या दरम्यानच गोविंदाच्या वकिलांनी मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी गोविंदाचे वकील म्हणाले,
वकील ललित बिंद्रांनी सांगितले, “त्यांनी कोणताही घटस्फोटाचा अर्ज दाखल केलेला नाही. त्यांच्यात सर्व काही ठीक आहे. लोक जुन्या गोष्टींबाबत चर्चा करीत आहेत आणि त्यावरुन अफवा पसरवत आहेत.”
तसेच ते पुढे असेही म्हणाले, “आता गणेश चतुर्थी येईल, तुम्हाला सर्व जण एकत्र दिसतील.” गेल्या काही महिन्यांपासून सुनीता आहुजांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे गोविंदाबरोबरच्या त्यांच्या नात्यामध्ये काही अडचणी असल्याच्या चर्चा होत आहेत.
सुनीता आहुजा यांनी असे म्हटले होते की, अनेक वर्षांपासून मी एकटी माझा वाढदिवस साजरा करते. त्या असेही म्हणालेल्या की, मी आणि गोविंदा वेगळे राहतो. त्याचे कारण म्हणजे गोविंदा खूप बोलतो आणि त्याचे कामही असते. त्याबरोबरच काही दिवसांपूर्वी सुनीता आहुजा यांनी त्यांच्या यूट्यूब व्लॉगमध्ये घटस्फोटाबद्दल वक्तव्य करीत त्या रडल्या होत्या. जे कोणी माझे घर फोडण्याचा प्रयत्न करील, त्याला देवी माफ करणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. तसेच गोविंदाच्या आजूबाजूला अनेक चुकिची माणसं असल्याचंही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याची सिनेविश्वात जोरदार चर्चा सुरु आहे.