डोंबिवली, कल्याण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा दिवसागणिक अतिशय गंभीर होत चालला आहे. या वाहतूक कोंडीने शहराचा बहुतांश भाग कोंडल्याचे दिसून आले आहे. गुरूवारी सकाळी प्रेम ऑटो ते शहाड मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.
शहरातील मुख्य असो की अंतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी वाहनांच्या एका मागोमाग एक लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गुरूवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्रेम ऑटो ते शहाडकडे जाणा:या मार्गावर अत्यंत धीम्या गतीने वाहतूक सुरू होती. आणि पुढील अवघ्या काही वेळेतच या संथ गतीने वाहतूकीचे अतिशय भयानक अशा वाहतूक कोंडीमध्ये रुपांतर झाले. प्रेम ऑटो ते शहाड ते उल्हासनगर अशा अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासाला तब्बल 2-2 तास लागत आहेत यावरूनच या भयानक वाहतूक कोंडीचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. या वाहतूक कोंडीमुळे त्यांचा परिणाम इतर ठिकाणी ही दिसून आला. हळूहळू मुरबाड रोड, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वालधूनी पूल परिसर, रामबाग, सहजानंद चौक, बिर्ला महाविद्यालय मार्ग, चिकणघर मुख्य चौक आणि आसपासच्या परिसरात त्याचे लोण पसरले. ही वाहतूक कोंडी फु टेर्पयत शाळा सुटण्याची वेळ झाली. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, आग्रा रोड, लालचौकी, शंकरराव चौक, अहिल्याबाई चौक, बाजारपेठ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. प्रमुख मार्ग वाहतूक कोंडीने विस्कळीत झाल्याने मग वाहनचालकांनी अंतर्गत भागातील रस्त्याकडे आपला मोर्चा वळविला आणि मग हे अंतर्गत मार्ग ही वाहनांनी तुडुंब भरलेले दिसून आले. वाहतूक क ोंडीची आजची परिस्थिती पाहता ही समस्या कोण, कशी आणि कधी सोडवणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.