मुंबई : ब्रम्हांड सज्जनशक्ती सांस्कृतिक मंचच्या वतीने 'वीरतेची गाथा, आईच सांगते कथा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'मातृदिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमात यावेळी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री ज्योतीताई राणे यांची मुलाखत घेण्यात येईल. शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:३० वाजता सांज स्नेह सभागृह, ब्रह्मांड येथे सदर कार्यक्रम संपन्न होत आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती ठाणे अध्यक्ष वृंदा टिळक संवादिका म्हणून उपस्थित असतील. अधिक माहितीसाठी रश्मीताई जोशी ९८२०५६९८८१, स्वप्नील देडे ८८०५०२९१६६, संतोष कुलकर्णी ९८१९८०११७७