श्रीवराह जयंतीनिमित्त चेंबूरमध्ये धार्मिक सोहळा आणि कौशल्यविकास कार्यशाळेचे आयोजन

    22-Aug-2025
Total Views |

मुंबई, हिंदू समाजाच्या परंपरेतील पवित्र दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवराह जयंतीनिमित्त चेंबूर (पूर्व) येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान श्रीविष्णूच्या वराह अवताराच्या जयंतीनिमित्त श्रद्धावंतांसाठी पूजन-अर्चा, सत्यानारायण महापूजा, सुंदरकांड पठण, कीर्तन तसेच महाआरती आणि महाप्रसाद यांचे आयोजन होणार आहे.

हा सोहळा सोमवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता टेंबे ब्रिज भाजी मार्केटसमोर, चेंबूर (पूर्व) येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दुपारी ४ वाजता मूर्तीस्थापना पूजन आणि तरुणांसाठी कौशल्य विकास सत्राचे आयोजन सायं. ५.३० वाजता केले आहे.यासोबत सुंदरकांड पठण महाआरतीसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मानस परिवार सेवा ट्रस्ट तर्फे करण्यात आले असून, हिंदू परंपरेचे पालन आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भाविकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.कार्यक्रमाच्या अधिक.माहितीसाठी ९८७००५२१७९ / ९८६९४६२०४२ / ९७६९४९०८२३ या क्रमांकावर संपर्क साधावा.