मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला विजयादशमीच्या दिवशी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. तर सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे बौद्धिक होणार आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर विजयादशमी उत्सव संपन्न होईल.
विजयादशमी उत्सव हा हिंदू समाजातील पौरूषत्व आणि शक्तीचे जागरण करणारा पवित्र उत्सव आहे. याच पवित्र दिनी डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९२५ रोजी सुरू झालेले संघाचे कार्य येत्या विजयादशमीला १०० वर्षे पूर्ण करत आहे. जागतिक शांतता आणि मानवी कल्याण या उद्देशाने सुरू झालेला प्रवास एक शतक पूर्ण करत आहे. संघ शताब्दी निमित्त यावेळी होत असलेला विजयादशमी उत्सव हा सर्व भारतीयांसाठी प्रेरणा देणारा असणार आहे.
अश्विन शुद्ध दशमी, गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.४० वाजता नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर उत्सव आयोजित करण्यात आला आहे.