बदलापूरचा देवाभाऊ चष्मा आफ्रिका खंडात दाखल

22 Aug 2025 18:00:29

कल्याण : नेपाळमधील १४० देशांच्या समिटमध्ये सादर झालेला जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा आता आफ्रिका खंडात पोहचला आहे. इथिओपियातील आदिस अबाबा येथे होत असलेल्या कोएत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला. या समिटमधील आफ्रिका खंडातील १२ देशांचा समावेश आहे. या देशांसोबत आफ्रिका खंडातील जवळपास ५५ देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे.

बदलापूरच्या व्हिजन फ्रें ड साकिब गोरे संस्थेने ३३ रुपयांत सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा बनवला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार आफ्रिका खंडातील सत्तर टक्के लोकांमध्ये दृष्टीदोषाची समस्या आहे. चष्मा परवडत नसल्याने अनेक लोक चष्म्यापासून वंचित आहेत. त्याचा परिणाम म्हणजे येथील लोकसंख्येची उत्पादकता घटत आहे. सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांनी आपल्या संस्थेमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने देवाभाऊ चष्मा लॉन्च केला आहे. इथिओपियातील आदिस अबाबा येथे होत असलेल्या कोएत्सा समिटमध्ये हा चष्मा सादर करण्यात आला. २० ते २२ ऑगस्ट दरम्यान या समिटचे आयोजन केले होते. या समिटमध्ये आफ्रिका खंडातील टांझानिया, युगांडा, रवांडा, केनिआ, इथिओपिया, बुरूंडी, मलावी, झांबिया, साऊथ सुदान, ङिाम्बाब्वे, सोमालिया, मोझांबिक या १२ देशांचा समावेश आहे. या देशांसोबतच आफ्रिका खंडातील जवळपास ५५ देशांमध्ये हा चष्मा अत्यंत कमी दरात उपलब्ध होणार आहे. हा चष्मा आफ्रिका खंडातील गरजू लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. इथिओपियातील कोएत्सा समिटनंतर २६ ऑगस्टला ब्राझीलमधील साओ पावलो इथे तर ३ सप्टेंबरला हा चष्मा केनियातील नैरोबी येथे लॉन्च केला जाणार आहे.


Powered By Sangraha 9.0