मुंबई : साहित्य अकादमी आयोजित साहित्य मंच या कार्यक्रमांतर्गत मराठी कविता वाचनाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:३० वाजता दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग येथील साहित्य अकादमी सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सदर कार्यक्रमात साहेबराव ठाणगे, सतीश सोळांकूरकर, अशोक गुप्ते, संगीता अरबुने,हर्षदा अमृते कविता वाचन करणार आहेत. सदर कार्यक्रम विनामूल्य असून, काव्य रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.