मुंबई : सृजनसंवाद प्रकाशन प्रकाशित मनीष तपासे लिखित "अस्वस्थ मनाच्या किनाऱ्यावर" या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता ठाणे पश्चिम येथील मराठी ग्रंथसंग्रहलाय येथील वा. अ. रेगे सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ कवी संजय चौधरी यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार असून, प्राचार्य, साहित्य अकादमीचे सदस्य प्राचार्य नरेंद्र पाठक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी गंगाधर अहिरे, कवी गीतेश शिंदे, समीक्षक सुजाता राऊत या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. दूरदर्शन निवेदिका मानसी आमडेकर सुसंवादकाची भूमिका पार पडणार आहे. सदर कार्यक्रम विनामूल्य असून, काव्यरसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.