रवींद्र जोशी स्मृती दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य शिबिर

21 Aug 2025 18:10:48

मुंबई : रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन तर्पे रविंद्र जोशी स्मृती दिनानिमत्त महिलांसाठी विशेष आरोगय तपासणी व जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नाना पालकर स्मृती समितीच्या सहकार्याने हे शिबीर २२ ऑगस्ट रेाजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता रविंद्र जोशी मेडिकल पाऊंडेशन सरस्वती अपार्टमेंट अंधेरी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मासिक पाळीतील त्रास गर्भाशय व पिशवीचे आजार स्तनातील गाठी व इतर विकार मुलींच्या वयात येतानाचे बदल पाळी जाताना व पाळीनंतरचे बदल प्रसूतीपुर्व व प्रसूतीनंतरची तपासणी याबाबत निवारण व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमात मा नगरसेविका संध्या सुनिल यादव यांच्यसह पाऊंडेशनचे आणि नाना पालकर स्मृती समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता उपस्थित असणार आहेत.


Powered By Sangraha 9.0