बार्टीमार्फत युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण
21-Aug-2025
Total Views |
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यशाळेत अनुसूचित जातीतील युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनविणे आणि स्वावलंबनाकडे वाटचाल घडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या प्रशिक्षणात ऑटोमोटिव्ह (टू व्हीलर-फोर व्हीलर) असिस्टंट, ब्युटी थेरपिस्ट, CNC मशीन ऑपरेटर, लाईट मोटार वाहन चालक, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, जनरल ड्यूटी असिस्टंट, प्लंबिंग, मिस्त्री, ऑफिस असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी, वेल्डिंग, ग्राफिक डिझाईन, फोर्कलिफ्ट ऑपरेटर अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
प्रशिक्षण कालावधी ३० ते ६० दिवसांचा असून पात्रता किमान ७ वी/१० वी/१२ वी उत्तीर्ण अशी आहे. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे असावे. या प्रशिक्षणाचे शुल्क पूर्णपणे विनामूल्य असून प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, रोजगार सहाय्यता, तसेच निवास व अन्नाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख २८ सप्टेंबर २०२४ असून अधिक माहितीसाठी व अर्जासाठी www.barti.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे बार्टीच्या वतीने कळविण्यात आले आहे.