मुंबई : भारत विकास परिषदेच्या माध्यमातून हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान डोंबिवली शाखेअंतर्गत " सैनिक हो तुमच्यासाठी" या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत देशवासियांच्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज असलेल्या सैनिकांकरीता दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी सैनिकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना चालून आले आहे. या अंतर्गत देणमूल्य ५००/- किंवा ५००/- च्या पटीत, भारत विकास परिषद मुंबई, कोकण प्रांत यांच्या नावे संबंधितांना द्यावा. यासाठी इच्छुकांनी ९८९२२५८९२३/९१६७७४४०४९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.