डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी निवासी मधील सिस्टर निवेदिता शाळेसमोर एक मोठे झाड कोसळल्याने चार पोल व एका ट्रान्सफॉर्मर याचे मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना रात्र अंधारात काढावी लागली. महावितरण कडून ते तातडीने नवीन बसाविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
निवासी भागातील महावितरणच्या असंख्य भूमिगत वाहिन्या याना नवीन काँक्रीट रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या आणि गटारी, नाले बनविताना नुकसान पोहचल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार गेले वर्षभर चालू आहेत. त्यामुळे नागरिक आणि महावितरण यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार यापुढेही चालूच राहणार असल्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.