समरसतेच्या ग्रंथदिंडीतून महापुरुषांच्या विचारांचा गौरव!

02 Aug 2025 18:01:17

नांदेड : समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य आयोजित, अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड व ज्ञान भारती विद्यामंदिर यांच्या सहयोगाने श्री गुरु गोविंदसिंघजी साहित्यनगरी भक्ती लॉनस, येथे दि. २ व ३ ऑगस्ट या दोन दिवसीय २० व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

समरसता साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीच्या माध्यमातून झाली. नांदेड शहरातून काढलेल्या या ग्रंथदिंडीमध्ये नाना पालकर प्राथमिक विद्यालय राणी लक्ष्मीबाई हायस्कूल व ज्ञान भारती विद्यामंदिर अशा शिक्षण संस्थांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांनी समाजसुधारकांचे देखावे सादर केले त्याचबरोबर वारकऱ्यांच्या वेशातील मुलांनी केलेला विठू नामाचा गजर, यामुळे दिंडीचा आनंद द्विगुणित झाला.

सदर ग्रंथ दिंडीमध्ये वासुदेव गोंधळी मशान जोगी नाथ जोगी, बहुरूपी मदारी असे अनेक लोककलावंत सहभागी झाले. शहरातील वेगवेगळ्या समाजसुधारकांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला संमेलना अध्यक्ष पद्मश्री नामदेवराव कांबळे व समारस्त साहित्य परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.


Powered By Sangraha 9.0