
मुंबई : महावीरीच्या ध्वजमिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक केल्याची घटना बिहारच्या मुझफ्फरपूर येथे नुकतीच घडली. साहेबगंज पोलिस स्टेशन हद्दीतील मीनापूर गावात एका मशिदीजवळील घरांच्या छतावरून धर्मांधांनी दगडफेक केल्याचे वृत्त आहे. या घटनेत राजेपूर स्टेशन प्रभारी राधेश्याम आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांसह अनेक पोलिस गंभीर जखमी झाले. या संघर्षादरम्यान एका झोपडीलाही आग लावण्यात आल्याची माहिती आहे.
प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती सध्या नियंत्रणात असून दगडफेक करण्यात सहभागी असलेल्यांची लवकरच ओळख पटवली जाईल. मिरवणुकीदरम्यान ड्रोनचा वापर केल्यामुळे त्यातील व्हिडिओ तपासून ओळख पटवणे शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुरुवारी स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने आणि पूर्वनियोजित मार्गानुसार मिरवणूक काढली जात होती. तथापि, हिंदूंची मिरवणूक मीनापूर मशिदीजवळ पोहोचताच काही धर्मांधांनी दगडफेक सुरू केली. तीन वर्षांपूर्वी महावीरीच्या ध्वज मिरवणुकीतही याच भागात अशीच एक घटना घडल्याचे वृत्त आहे.
उल्लेखनीय म्हणजे, महावीरीची झंडा यात्रा ही एक वार्षिक परंपरा आहे आणि ती मीनापूर गावातून जाते आणि लखनासेन आखाड्यात पोहोचते जिथे तिचे विसर्जन केले जाते. या काळात, शीतल सेमरासह अनेक गावातील लोक महावीरीच्या ध्वजासह मिरवणुकीत सहभागी होतात. लखनासेनमध्ये महावीरीचा मेळा मोठ्या प्रमाणात भरतो.