स्वातंत्र्यदिनासंदर्भात संकल्पना पाठविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

02 Aug 2025 15:18:15

नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे.

आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात आपणास कोणते विषय किंवा संकल्पना प्रतिबिंबित झालेल्या आवडतील यासाठी नागरिकांनी MyGov आणि NaMo App वरील खुल्या मंचावर आपले विचार व्यक्त करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Powered By Sangraha 9.0