मुंबई : कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी माहिमच्या एल.जे. रोडवर न्यायालयाच्या मनाई नंतरही कबुतरांना खाद्य दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यासंबंधित एका अनोळखी इसमाविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.
काही आठवड्यांपूर्वी राज्य सरकारने बृहन्मुंबई महानगरपालिकेला मुंबईतील कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यावर मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी करत नागरिकांना कबुतरांना खाद्य न देण्याचे निर्देश दिले होते, मात्र नागरिकांकडून याचे पालन होत नसल्याचे माहिममधील एल.जे. रोडवर झालेल्या प्रकारानंतर आता स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून घेतलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला नागरिकांचा पाठिंबा दिसत नाही आहे. राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका वारंवार नागरिकांना यासबंधित निर्देश देत आले आहेत, तरीही कबुतरांना खाद्य देण्याचे प्रकार अजूनही अनेक ठिकाणी सुरूच...