माणगाव तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन उभे झाले : उपमुख्यमंत्री अजित पवार

02 Aug 2025 18:10:36

रायगड : माणगाव तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाचे दालन उभे झाले असून येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पहावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंगच्या नामकरण आणि उद्घाटन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "रायगड जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता राज्यशासन प्रयत्नशील आहे. माणगाव येथील पवित्र भूमीत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाची एक अद्यावत अशी नर्सिंग कॉलेजची इमारत उभी झाली आणि त्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले. माणगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षणाचे दालन उभे झाले आहे येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक ज्ञान कसे मिळेल ते पहावे.या नर्सिंग कॉलेजला खासदार सुनील तटकरे यांच्या आईचे नाव दिले असून त्यांच्या आईच्या नावाला साजेसे काम येथून व्हावे," असे त्यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0