रुग्णसेवा, समाजसेवा व राष्ट्रसेवा असा तिहेरी सुवर्णयोग साधणार्या नाशिकच्या सुप्रसिद्ध डॉ. उमेश मराठे यांच्याविषयी...
डॉ.उमेश मराठे यांचे बालपण जुन्या नाशिकमध्ये गेले असून, नाशिकमध्येच त्यांनी वैद्यकीय शिक्षण-गुणवत्तेवर प्रवेश करून मविप्रच्या आडगाव मेडिकल महाविद्यालयात पूर्ण केले. ‘स्त्रीरोग व प्रसूति’ या विषयात त्यांनी पदविकाही प्राप्त केली. सर्वसामान्यांना परवडेल असे ’लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालया’ची २००३ला सुरुवात करत, अनेक कठीण शस्त्रक्रियाही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. डॉ. मराठे यांच्यामुळे आजवर अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णांसाठीही, अत्यल्प दरात शस्त्रक्रिया शिबिरेही त्यांनी अनेक वेळा घेतली आहेत. त्याचा मोठा लाभही समाजातील गरिबांना झाला. शस्त्रक्रिया करत असताना, त्याचा होणारा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडणारा नाही, याची खंत त्यांना नेहमी जाणवायची. रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे आणि त्रासही कमी व्हावा, यासाठी त्यांनी दुर्बिण शस्त्रक्रियेसाठीच्या लॅप्रोस्कोपिक ऑपरेशन थिएटरचीही निर्मिती केली. तसेच, त्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षणही केरळ येथून घेतले. या तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत त्यांनी अडीच हजारांपेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये लॅप्रोस्कोपीची आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे उपलब्ध आहे. येथे अनेक दुर्मीळ व जटिल शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी उत्तर महाराष्ट्रभर डॉ. मराठे यांचा नावलौकिक आहे.
दैनंदिन रुग्णसेवा करताना, अनेक जोडपी त्यांच्याकडे वंध्यत्व उपचारासाठी येत होती. त्यांना इतरत्र जावे लागू नये, म्हणून त्यांनी स्वतः जर्मनीमधून ‘डिप्लोमा इन एआरटी’ ही पदवी संपादन केली. कोलकाता येथे देशातल्या नामांकित वंध्यत्व तज्ज्ञांकडून अनेक केसेसचा अभ्यास केला. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय नामांकनानुसार उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण ’स्प्राऊटिंग सीड्स आणि आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर’ची स्थापना केली. त्यामुळे आता एकाच छताखाली वंध्यत्वार उपचार व निदान दोन्ही केले जाते. यामध्ये बीज निर्मिती प्रक्रियेच्या तपासणीसाठी, ओहुलेशन स्टडी सोनोग्राफी सुविधा, शुक्राणू तपासणीसाठी विशेष लॅब, शुक्राणू साठवून ठेवण्याच्या सुविधेबरोबरच ’आययुआय’ आणि ’आयव्हीएप-आयसीएसआय’ अशा सुविधाही अत्यंत वाजवी दरात, डॉ. मराठेंनी समान्यांना उपलब्ध करून दिल्या. अनेकदा एखाद्या महिलेच्या गर्भाशयात गर्भाची वाढ होत नाही, तेव्हा दुसर्या स्त्रीच्या गर्भामध्ये गर्भ वाढविला जातो. ‘आयसीएसआय’सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने स्त्रीबीज फलित करून, सरोगेट स्त्रीच्या गर्भाशयात तो गर्भ रोवला जातो. डॉ. मराठे यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक जोडप्यांना या पद्धतीने मातृत्वाचा आनंद मिळवून दिला आहे. त्यामुळे अल्पावधीतच शहरातील नामांकित व हमखास मातृत्व देणारे हॉस्पिटल म्हणून, ‘स्प्राऊटिंग सीड्स आईवीएफ आणि फर्टिलिटी टेस्ट ट्युब सेंटर’चा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गौरवाने उल्लेख होतो आहे.
नाशिकमध्ये लेखानगरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी लाईफ केअर हॉस्पिटल व ‘स्प्राऊटिंग सीड्स आयवीएफ सेंटर’ असून, रोगनिदान व सुयोग्य औषधोपचार यांची सांगड घातल्याने दोन्ही रुग्णालये खर्या अर्थाने सर्वसामान्यांची काळजीवाहक ठरली आहेत. रुग्णसेवेबरोबर ‘रुद्रा’ या सामजिक संस्थेच्या माध्यमातून गुणवंत गौरव सोहळा, डॉटर दिन, आरोग्य तपासणी शिबीर, पोलिसांची आरोग्यविषयक तपासणी, स्त्रीरोगविषयी कार्यशाळा अशा विविध उपक्रमांचे आयोजनही डॉ. मराठे वर्षभर करतात. यामुळेच रुग्णांसाठी रामबाण इलाज शोधणारे डॉ. उमेश मराठे, नाशिककरांना रुग्णांनाही आपलेसे वाटतात. ‘कोरोना’च्या काळातसुद्धा लाईफ केअर हॉस्पिटलच्या माध्यमातून संपूर्ण रुग्णालयाचे रुपांतर ‘कोविड’ रुग्णालयामध्ये करून, डॉ. मराठेंच्या टीमने तीन हजारांहून अधिक रुग्णांची या काळामध्ये सुश्रुषा केली. डॉ. मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग, अस्थिरोग, युरोलॉजी, कॅन्सर आदि शस्त्रक्रिया, अद्ययावत तंत्रज्ञानाने अत्यल्प दरात केल्या जातात. ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’चा व ’महाराष्ट्र पोलीस आरोग्य सेवे’चा लाभही येथे रुग्णांना मिळतो. ‘कोविड’ लसीकरणामध्ये डॉ. रुग्णालयाने २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण केले आहे. तसेच, एक लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा डॉ. मराठे यांचा संकल्पही पूर्ण केला. समाजमाध्यमातून डॉ. मराठी त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांच्या शंकांचे निरसन केले असून, ‘स्प्राऊटिंग सीडस् आईवीएफ आणि इन्फर्टिलिटी सेंटर’ हे रुग्णांना मातृत्वाचा आनंद देणारे नाशिकचे अग्रगण्य नाव आहे. जागतिक अहवालानुसार टेस्ट ट्युब बेबी आयवीएफ चा यशस्वीता दर हा ३५ टक्के आहे, परंतु डॉ. मराठे यांच्या आयवीएफ यशाचा दर ८२ टक्क्यांपर्यंत आहे. पारदर्शी प्रक्रिया, अत्यल्प दर, रुग्णांची विशेष काळजी व अनमोल मार्गदर्शन अशा चतुःसूत्रीने गांजलेल्यांना मातृसुखाची संजीवनी देत, ‘स्प्राऊटिंग सीडस् आयवीएफ व टेस्ट ट्युब सेंटर’ यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. परंतु, डॉ. मराठे यांच्यासाठी रुग्णांच्या हाती असलेले अपत्य, हेच त्यांच्या सेवेचे समाधान आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या पदरामध्ये मातृत्वाचे दान टाकणार्या डॉ. उमेश मराठे यांना, पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
विराम गांगुर्डे
९४०४६८७६०८