७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

02 Aug 2025 14:20:58

नवी दिल्ली: केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत केलेल्या घोषणेनुसारस, '७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३' मध्ये सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपट 'आत्मपॅम्फलेट' आणि 'नाळ २' या चित्रपटांना स्वर्ण कमळ पुरस्कार घोषित करण्यात आले आहे.


'जिप्सी' या चित्रपटातील बाल कलाकार कबीर खंदारे याला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार तर त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना संयुक्तपणे नाळ २ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे.

७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ च्या विजेत्यांच्या यादीत सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार 'जॅकफ्रूट'ला देण्यात आला आहे. हा चित्रपट १९ मे २०२३ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तसेच '12th फेल' चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळवला आहे. त्याचबरोबर शाहरुख खानला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे, शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी तर विक्रांत मेस्सीला '12th फेल' चित्रपटासाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात येणार आहे.'मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे'चित्रपटासाठी राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित.


राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – कटहल- अ जॅकफ्रुट मिसरी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुदिप्तो सेन (द केरला स्टोरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – उर्वशी (उलोझुक्कु)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजयराघवन आणि मुथुपेट्टई सोमू भास्कर
राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट – सॅम बहादुर


Powered By Sangraha 9.0