मुंबई : मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे ४ ते सकाळी ११ पर्यंत सरासरी १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची ३.९ मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून ३५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.