सिरियल किलर'प्रमाणे राहुल गांधी 'सिरियल लायर'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

    19-Aug-2025   
Total Views |

मुंबई : ज्याप्रमाणे सिरियल किलर असतात, त्याप्रमाणे राहुल गांधी सिरियल लायर आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी केली.

लोकनीती-सीएसडीएसचे सह-संचालक संजय कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील त्यांच्या पोस्टबद्दल जाहीरपणे माफी मागितली. त्यांनी पोस्ट केलेले आकडे चुकीचे असल्याचे त्यांनी कबुल केले आहे. परंतू, याच आकड्यांचा आधार घेत काँग्रेसने निवडणूक आयोगावर आरोप केले होते.

याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सीएसडीएसने दिलेल्या डेटाच्या आधारे राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते आणि आमच्या कायदेशीररित्या निवडून आलेल्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. आज सीएसडीएसने आमचे आकडे चुकीचे होते याबद्दल माफी मागितली असून ते आकडे परत घेतले आहेत. आता त्यावर आकांत तांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? याबद्दल मला बिलकूल अपेक्षा नाही. ज्याप्रमाणे सिरियल किलर असतात, त्याप्रमाणे राहुल गांधी सिरियल लायर आहेत. त्यामुळे ते रोज खोटे बोलतील आणि हेच आकडे मागतील, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण जनतेच्या समोर आज सगळे स्पष्ट झाले आहे," असे ते म्हणाले.

इंडीया आघाडीकडे मतही नाही आणि बहुमतही नाही


उपराष्ट्रपती पदासाठी इंडीया आघाडीने दिलेल्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले की, "उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध करायला हवी होती. त्यामुळे अशा उच्च पदांसंदर्भात एक चांगले चित्र गेले असते. इंडीया आघाडीकडे मतही नाही आणि बहुमतही नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवार हरणार आहे, हे त्यांना माहिती आहे. त्यापेक्षा एकत्रितपणे निवडणूक झाली असती तर चांगले चित्र गेले असते," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्ह

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....