क्रिशा, स्पर्शला नाखवा स्मृती पुरस्कार

    19-Aug-2025
Total Views |


ठाणे : यंदा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी शालांत परीक्षेत 97.66 टक्के गुण संपादन करुन क्रिशा मनिषा विजय देवरे 74 व्या कै यशवंत लक्ष्मण नाखवा स्मारक पारितोषिकाची तर याच परीक्षेत 93.80 टक्के गुण संपादन करुन स्पर्श श्वेता प्रकाश वरेकर 73 व्या कै दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिकाचा मानकरी ठरला असल्याचे श्री आनंद भारती समाज, ठाणे संस्थेचे कार्यवाह संदीप कोळी यांनी दिली.


शतायुषी सेवाभावी आनंद भारती समाज, ठाणे तर्फे संस्थेचे संचालक कै य. ल. नाखवा यांच्या स्मरणार्थ गुणानुक्रमे ठाणे केंद्रात सर्वप्रथम येणाऱ्या उमेदवाराला हे पारितोषिक देण्यात येते. तर याच परीक्षेत संस्थेत प्रथम येणाऱ्या उमेदवाराला आद्य संस्थापक कै द. पा. नाखवा पारितोषिक देण्यात येते.


27 ऑगस्ट ते 6सप्टेंबर दरम्यान श्री आनंद भारती समाज सभागृहात होणाऱ्या 115 व्या श्री गणेशोत्सवात शनिवार, 30 ऑगस्ट रोजी वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभात ठाण्याच्या मो. ह विद्यालय .कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विकास पाटील यांच्या हस्ते उभंयतांचा सन्मान करण्यात येणार आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे हे दोन्ही उमेदवार ठाणे पूर्व येथील श्री माँ बालनिकेतन विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.


यंदाच्या गणेशोत्सवत आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ या विषयावर आधारित देखावा जेष्ठ सजावटकार सुभाष शाक्यवार करणार आहेत.