कर्नाटकातील हिंदू धर्मस्थळांना बदनाम करण्याची शहरी नक्षलवाद्यांची मोहिम; कर्नाटक भाजप आमदार हरीश पुंजा यांचा आरोप

18 Aug 2025 18:44:17


मुंबई
: बेलथंगडी येथे पत्रकारांशी बोलताना पुंजा म्हणाले की, धर्मस्थळ मंदिराची बदनामी करणाऱ्या शहरी नक्षलवाद कार्यकर्त्यांच्या एका गटावर टीका केल्यामुळे श्री. संतोष यांच्याविरुद्ध अपमानास्पद वैयक्तिक टिप्पणी केली जात आहे.

पुंजा म्हणाले की, श्री संतोष हे अशा स्वयंसेवकांपैकी एक आहेत जे आपला वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून देशाच्या हितासाठी लढत आहेत. श्री संतोष यांच्याबद्दल वाईट बोलून एका गटाने देशातील सर्व स्वयंसेवकांची बदनामी केली आहे. धर्मस्थळ मंदिराविरुद्ध 'काल्पनिक वृत्तांकन' आणि 'अपमानजनक' टिप्पण्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने सुरूच आहेत.

सौजन्या बलात्कार आणि हत्येचा पुनर्तपास करण्याची आणि खऱ्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी श्री. पुंजा यांनी पुन्हा एकदा केली. २०२४ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने एकमेव आरोपी संतोष राव याला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुनर्तपासणी करण्याची मागणी फेटाळून लावली.




Powered By Sangraha 9.0