शाळा अंतर्गत फेरीमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

18 Aug 2025 16:23:01

नवी मुंबई : आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना आपली मते प्रभावीपणे व्यक्त करण्यासाठी आणि वक्तृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल कामोठे येथे शाळा अंतर्गत फेरी उत्साहात पार पडली होती. या फेरीतून प्रत्येक इयत्तेतून ६ विद्यार्थी पुढील अंतरशालेय फेरीसाठी पात्र झाले आहेत. एकूण ६० विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, उच्चार, देहबोली व सादरीकरणाच्या कौशल्याचा विशेष गौरव करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कामोठे मंडल अध्यक्ष कामोठे , माजी अध्यक्ष रवी जोशी, डॉ. सखाराम गारळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, प्रविण कोरडे, अमोल बिनवडे यांच्यासह कोशिश फाऊंडेशनचे स्वयंसेवक, शिक्षकवर्ग, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी माझं स्वप्न, शिक्षणाचं महत्त्व, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त भारत, मोबाईल नसते तर?, इंटरनेट – वरदान की शाप? अशा विविध विषयांवर जोशपूर्ण आणि प्रभावी भाषणे दिली होती . स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला, विचार मांडण्याची क्षमता सुधारली आणि व्यासपीठावर बोलण्याची भीती कमी झाली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो, असे मत यावेळी प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.


Powered By Sangraha 9.0