पूजेसाठी परवानगी नाही, नमाजसाठी जागाच जागा; कम्युनिस्टांचा हिंदुविरोधी चेहरा पुन्हा समोर

18 Aug 2025 14:43:50


मुंबई : केरळमधील सत्ताधारी पक्ष सीपीआय(एम) च्या धर्माबद्दलच्या दृष्टिकोनावर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. सीपीआय(एम) एकीकडे धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतो, पण जेव्हा हिंदू किंवा अल्पसंख्याकांचा विचार येतो तेव्हा पक्षाचा दृष्टिकोन वेगळा दिसतो.

अलिकडेच, केरळचे माजी गृहमंत्री कोडिएरी बालकृष्णन यांचे पुत्र आणि सीपीआय(एम) सदस्य बिनेश कोडिएरी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यामध्ये सीपीआय(एम) पक्ष कार्यालयात एक माणूस नमाज पठण करताना दाखवले गेले आहे.

बिनेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सीपीआय(एम) चे कौतुक केले आणि म्हटले की पक्षाने त्या माणसाला नमाजासाठी जागा देऊन त्याच्या धार्मिक भावनांची काळजी घेतली. हे प्रेम आणि बंधुत्वाचे उदाहरण असून आणि हीच केरळची ताकद असल्याचे सांगितले. या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली कारण त्यातून पक्षाचा एक विशेष दृष्टिकोन उघड झाला.

आनंद नावाच्या एका 'एक्स' वापरकर्त्याच्या मते, व्हिडिओमधील माणूस कोल्लमचा एक फेरीवाला आहे जो बेडशीट विकून उदरनिर्वाह करतो. पावसामुळे या मुस्लिम व्यक्तीने स्थानिक सीपीआय(एम) कार्यकर्त्यांकडे नमाजासाठी जागा मागितली होती. पक्षाने लगेचच त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना कार्यालयात नमाजाची परवानगी दिली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नमाजची घटना अतिशय सकारात्मक पद्धतीने मांडली आणि ती बंधुत्वाचे प्रतीक असल्याचे म्हटले. परंतु, हिंदूंच्या बाबतीत अशी उदारता, सहिष्णुता आणि अनुकूल वृत्ती सहसा दिसून येत नाही. कारण जेव्हा हिंदूंचा विचार केला जातो तेव्हा पक्षाचा दृष्टिकोन अनेकदा वेगळा असतो. हा फरक लोकांना स्पष्ट समजतो.

पुढील काही उदाहरणांवरून कम्युनिस्टांचा हिंदुविरोधी चेहरा लक्षात येईल.

घटना १ : सीपीआयएमने थांबवलेलं गणेश यज्ञ


फेब्रुवारी २०२४ मध्ये केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील नेदुम्मनूर एलपी शाळेमध्ये आयोजित गणेश यज्ञावर सीपीआयएमने आक्षेप घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सीपीआयएमशी संबंधित लोकांना या पूजेची माहिती मिळाली तेव्हा ते तिथे पोहोचले. त्यांनी विधी थांबवला आणि आयोजकांना मारहाणही केली. यानंतर पोलिसांनी प्रकरण आपल्या हाती घेतले आणि आयोजकांना अटक केली. ही घटना इथेच संपली नाही. नंतर सीपीआय(एम) कार्यकर्त्यांनी शाळेवर निषेध मोर्चा काढला. तथापि, ही पूजा शाळा प्रशासनाच्या पूर्वपरवानगीने केली जात होती आणि दरवर्षी महानवमीनिमित्त ती परंपरेनुसार आयोजित केली जाते. सीपीआयएमला हा धार्मिक कार्यक्रम सहन झाला नाही आणि त्यांनी निषेध केला.

घटना २ : मंदिरात प्रार्थना केल्याबद्दल सीपीआयएमने पक्षाच्या नेत्याला फटकारले



सप्टेंबर २०१७ मध्ये, सीपीआयएमने त्यांचेच मंत्री कडकमपल्ली सुरेंद्रन यांना त्रिशूरमधील प्राचीन श्री गुरुवायूर मंदिराला भेट दिल्याबद्दल आणि पुष्पांजली अर्पण केल्याबद्दल फटकारले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते ज्यामध्ये त्यांनी पारंपारिक मुंडू आणि मेलामुंडू वेश परिधान केलेला दिसत होता. त्यांच्या कपाळावर चंदन लावले होते आणि त्यांनी मुलांना भगवान श्रीकृष्णाची वेशभूषा केली होती. या घटनेनंतर, सीपीआयएमच्या अंतर्गत समितीने म्हटले की, त्यांचे वर्तन पक्षाच्या तत्वांशी जुळत नाही. या प्रकरणाचा चौकशी अहवालही तयार करण्यात आला. पक्षाने स्पष्ट केले की श्री गुरुवायूर मंदिरात प्रार्थना करणे हे सीपीएमच्या तत्वांविरुद्ध आहे. सुरेंद्रन यांना पक्षाच्या तत्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

घटना ३ : ज्योतिष्याला भेटल्याबद्दल सीपीआयएम नेत्याची चौकशी


ऑगस्ट २०२४ मध्ये सीपीआयएमचे राज्य सचिव एम व्ही गोविंदन यांना पक्षाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर महावा पोदुवल नावाच्या हिंदू ज्योतिषाकडे ज्योतिषशास्त्रावर चर्चा करण्यासाठी गेल्याचा आरोप होता. यावर ज्योतिषी महावा पोदुवल यांनी स्पष्ट केले की, गोविंदन फक्त त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आणि चहासाठी आले होते. त्यांनी सांगितले की भेटीदरम्यान ज्योतिषशास्त्रावर कोणतीही चर्चा झाली नाही. पोदुवल यांनी स्पष्ट केले की, “वैयक्तिक संबंधांना ज्योतिषशास्त्राशी जोडणे चुकीचे आहे." त्यांनी असेही म्हटले की, त्यांचे सीपीआयएम नेते एम व्ही गोविंदन आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या दोघांशीही वैयक्तिक संबंध आहेत.




Powered By Sangraha 9.0