मुंबईत 'फिट इंडिया' या संकल्पनेवर आधारित सायकल रॅलीचे आयोजन
18-Aug-2025
Total Views |
मुंबई: 'फिट इंडिया' या संकल्पनेवर आधारित सायकल रॅलीचे आयोजन हे ३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि साठये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
या रॅलीच्या उद्घाटन साठये महाविद्यालयाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल धीरेंद्रसिंग सयाना, ॲडमिनिस्ट्रेटीव ऑफिसर, ३ महाराष्ट्र बटालियन कर्नल प्रखर सिन्हा, एनसीसी अधिकारी डॉ. कॅ. गौरंग राजवाडकर आणि साठये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले.
या रॅलीत एकूण १५० एनसीसी कॅडेट्सनी उत्साहाने सहभाग नोंदवला. ही रॅली साठये महाविद्यालयापासून जुहू बीचपर्यंत होती. या रॅलीच्या माध्यमातून समाजामधील सर्वांना विशेषतः तरुणाईला आरोग्य, तंदुरुस्ती व शिस्तीचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमातून फिट इंडिया मूव्हमेंटची संकल्पना प्रभावीपणे जनमानसात पोहोचविण्यात आली. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सायकलिंगचा स्वीकार हा आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैलीचा पर्याय म्हणून करावा, हा संदेश रॅलीतून अधोरेखित झाला. मान्यवरांचे मार्गदर्शन आणि कॅडेट्सचा सक्रीय सहभाग यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.