किश्तवाड जिल्ह्यातील चशोती गावात ढगफुटीने विध्वंस; संघ आणि सेवा भारतीचे कार्यकर्ते पुनर्वसन कार्यात तत्पर

18 Aug 2025 15:09:14

मुंबई : जम्मू - काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील मचैल माता यात्रेचा मुख्य आणि पहिला थांबा म्हणजे किश्तवार जिल्ह्यातील माचैल माता यात्रेचा मुख्य आणि पहिला थांबा म्हणजे चशोती. येथूनच यात्रेकरू मचैल माता मंदिराकडे पायी जातात. परंतु १४ ऑगस्ट रोजी गावात ढगफुटी झाली आणि झालेल्या विध्वंसानंतर कार्यतत्पर
 संघ आणि सेवा भारतीचे कार्यकर्ते मदत, सेवा आणि पुनर्वसन कार्यात धावून आले आहेत. या आपत्तीमध्ये ६१ जण दगावले असून ७५ जण अजूनही बेपत्ता आहेत.

आपत्तीनंतर लगेचच संघ आणि सेवा भारतीचे कार्यकर्ते रुग्णवाहिका सेवा आणि जखमींना उपचार देण्यात गुंतले आहेत. सेवा भारतीने गावामध्ये अन्नदान सेवा देखील सुरू केली आहे. संघाचे स्वयंसेवक देखील एनडीआरएफ आणि एसडीआरएफसोबत मदत कार्यात गुंतले आहेत. तसेच संघाचे स्वयंसेवक पदपथ बांधण्याचे आणि दुरुस्तीचे कामही करत आहेत.

स्वयंसेवकांव्यतिरिक्त, सेवा भारती आणि अभाविपचे कार्यकर्ते देखील किश्तवाड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची सेवा करण्यात गुंतले आहेत. सेवा भारतीने जम्मूमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या जखमींसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे.




Powered By Sangraha 9.0