काँग्रेसमुळेच तेलंगणवर कर्जाचा वाढता बोजा!

    17-Aug-2025
Total Views |

मुंबई , तेलंगणमधील मुख्यमंत्री ए रंवत रेंड्डी यांच्या नेतृत्वामधील काँग्रेस सरकारने तेलंगणाच्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा डोंगर उभा केल्याची टीका बीआरएसने केली. बीआरएस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांनी काँग्रेसने गेल्या २० महिन्यात घेतलेले कर्ज चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील बीआरएस सरकारच्या मागील १० वर्षातील कर्जापेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.

तेलंगणचा विकास करण्याची स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारवर आता त्यांच्या आर्थिक नितीवरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रंवत रेड्डी सरकारच्या आर्थिक नितींमुळे तेलंगण राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहाण्याची स्थिती असल्याचे मत विरोधकांकडून व्यक्त केले जात आहे. यामध्ये बीआरएस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव यांनी काँग्रेसने गेल्या २० महिन्यात राज्यावर लादलेले कर्ज हे बीआरएसच्या १० वर्षांतील सरकारपेक्षा अधिक असल्याची टीका केली. कोविड-१९ महामारीच्या काळात महसूलाचा अभाव असूनही, बीआरएस सरकारने रायथू बंधू, कल्याण लक्ष्मी, पेन्शन आणि धान्य खरेदी यांसारख्या कल्याणकारी योजना सुरू ठेवणे फक्त कार्यक्षम नेतृत्वामुळेच शक्य झाले. आताच्या काँग्रेस सरकारला चांगले उत्पादन देणारे राज्य मिळाले आहे, मात्र नेतृत्वाच्या अभावामुळे राज्यकारभार चालवण्यास काँग्रेस असमर्थ असल्यचीही टीका केटी रामा राव यांनी केली.

आज तेलंगणातील शेतकरी खतांसाठी रांगेत उभे राहात आहे, तसेच शेतीसाठी युरिआदेखील कमी असल्याचे राव यांनी म्हटले. रेवंत रेड्डी यांच्यावर टीका करताना रेड्डी यांनी जनहिताच्या कामांपेक्षा, फक्त पैसे उभारून त्याची बंडले दिल्लीला पाठवण्यातच रस असल्याचे राव यांनी म्हटले.

तर बीआरएसचे नेते आणि माजी मंत्री टी हरिष यांनीही रेड्डी सरकारवर टीका करताना, रेड्डी यांचे सरकार वाढीव करांचा भार जनतेवर टाकत असल्याचा आरोप केला. तसेच, सलग दुसर्या महिन्यात चलनवाढ सुरु असून, त्याचा सामना करण्याची कोणतीही रणनिती रेड्डी सरकारकडे नसल्याची टीकाही हरिष यांनी केली. काँग्रेसने सरकारने वाढवलेल्या रस्ते कर आणि शुल्काकडे लक्ष वेधताना, बीआरएस यांच्या १० वर्षांच्या काळात हे कर कमी करण्यावर काम झाल्याचेही हरिष यांनी अधोरेखित केले.

तेलंगण सरकारची आर्थिक स्थिती


- तेलंगणचे कर्ज जवळपास ४.५ लाख कोटी रुपयांच्या घरात

- काँग्रेस सरकारची खुल्या बाजारातून ५७,११२ कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यच्या प्रस्तावला मंजूरी दिली.

- ३९०० कोटी केंद्र सरकारकडून आणि १००० कोटी रुपये कर्ज खुल्या बाजारातून उभारणार

- तेलंगणच्या एकूण कर्जापैकी त्यापैकी १.५८ लाख कोटींचे कर्ज काँग्रेस सरकारचे